गेल्या वर्षाच्या तुलनेत २०२२ हे नवे वर्ष सर्वांना मनःस्वास्थ्य नि मनःशांती मिळवून देवो. या वर्षात प्रत्येकामधला माणूसपणाचा अंश एका थेंबाने का होईना वाढवा
असह्य अशा बंदिस्त नि कुंठित अवस्थेतून सध्या जग जात आहे. हा बंदिस्तपणा, हे जखडलेपण कोरोना विषाणूच्या जीवघेण्या हल्ल्यातून आले आहे. नियंत्रणात येतो, म्हणता म्हणता नवे रुप घेऊन तो माणसाच्या धैर्याची, जिद्दीची आणि एकूणच माणूसपणाची परीक्षा पाहतो आहे. म्हणूनही २०२२ हे नवे वर्ष नवा सूर्य नवा चंद्र घेऊन उगवेल, अशी आशा प्रत्येक जण ठेवून आहे.......